Abhang marathi

  1. संत बहिणाबाई अभंग


Download: Abhang marathi
Size: 30.54 MB

संत बहिणाबाई अभंग

संत बहिणाबाई अभंग गाथा एकूण ३१ संत बहिणाबाई अभंग – १ आदिनाथें उपदेश पार्वतीस केला । मत्स्येंद्रें ऐकिला मच्छगर्भी ॥ १ ॥ शिवह्रदयींचा मंत्र पैं अगाध । जालासे प्रसिद्ध भक्तियोगें ॥ २ ॥ तेणें त्या गोरक्षा केलें कृपादान । तेथोनी प्रकट जाण गहिनीप्रती ॥ ३ ॥ गहिनीनें दया केली निवृत्तिनाथा । बाळक असतां योगरूप ॥ ४ ॥ तेथोनि ज्ञानेश पावले प्रसाद । जाले ते प्रसिद्ध सिद्धासनीं ॥ ५ ॥ ‘सच्चिदानंद बाबा’ भक्तीचा आगरू । त्यासी अभयवरू ‘ज्ञाने’ केला ॥ ६ ॥ पुढें विश्वंभर शिवरूप सुंदर । तेणें राघवीं विचार ठेविलासे ॥ ७ ॥ केशव चैतन्य बाबाजी चैतन्य । झालेसे प्रसन्न ‘तुकोबासी’ ॥ ८ ॥ एकनिष्ठ भाव तुकोबा-चरणीं । म्हणोनी ‘बहिणी’ लाधलीसे ॥ ९ ॥ संत बहिणाबाई अभंग – २ उघडोनी नेत्र पाहे जंव पुढें । तंव दृष्टी पडे पांडुरंग ॥ १ ॥ देखिली पंढरी ध्याना तेची । येत जयराम दिसत दृष्टीपुढें ॥ २ ॥ ब्राह्मण स्वप्नांत देखिला तो जाण । त्याची आठवण मनीं वाहे ॥ ३ ॥ न दिसे आणिक नेत्रांपुढें जाण । नामाचें स्मरण मनीं राहे ॥ ४ ॥ पूर्वील हरिकथा आयकिल्या होत्या । त्या मनीं मागुत्या आठवती ॥ ५ ॥ तुकोबाची पदें अद्वैत प्रसिद्ध । त्यांचा अनुवाद चित्त झुरवी ॥ ६ ॥ ऐसीं ज्याचीं पदें तो मज भेटतां । जीवास या होतां तोष बहु ॥ ७ ॥ तुकोबाचा छंद लागला मनासी । ऐकतां पदांसी कथेमाजीं ॥ ८ ॥ तुकोबाची भेटी होईल ते क्षण । वैकुंठासमान होये मज ॥ ९ ॥ तुकोबाची ऐकेन कानीं हरिकथा । होय तैसें चित्ता समाधान ॥ १० ॥ तुकोबाचें ध्यान करोनी अंतरीं । राहे त्याभीतरीं देहामाजीं ॥ ११ ॥ बहिणी म्हणे तुका सद्‌गुरु सहोदर । भेटतां अपार सुख होय ॥ १२ ॥ संत बहिणाबाई अभंग – ३ मच्छ जैसा जळावांचोनी तडफडी । तैसीच आवडी तुकोबाची ॥ १ ॥ अंतरींचा साक्षी असेल जो प्राणी । अनुभवें मनीं ज...